आता बेशिस्त वाहनधारकांसह नागरिकांवर असणार ड्रोनची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:47 AM2020-04-11T08:47:42+5:302020-04-11T08:51:08+5:30

सोलापूर ग्रामीण पोलीसांची शक्कल; नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर कारवाई

Now, the drone will be on civilians, including the most car-savvy | आता बेशिस्त वाहनधारकांसह नागरिकांवर असणार ड्रोनची करडी नजर

आता बेशिस्त वाहनधारकांसह नागरिकांवर असणार ड्रोनची करडी नजर

Next
ठळक मुद्देपंढरपुरात नियमांचे उल्लघंन करणाºया 87 जणांवर गुन्हे दाखलपंढरपुरात वाहनधारकांकडून 4 लाख 71 हजारचा दंड वसुल पंढरपूर पोलीसांनी केली 802 वाहने केली जप्त

पंढरपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याची बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे विनाकारण गर्दी करणाºया नागरिकांवर ड्रोन कॅमेराव्दारे लक्ष ठेवण्यात येत आहे.  या कॅमेºयाव्दारे गर्दीचे ठिकाणे व नाक्यावर विशेष नजर ठेवण्यात येत असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासनाने संचार बंदी  घोषीत केली  आहे. संचारबंदी सुरु असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाºया पंढरपूर उपविभागात  87 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  तसेच वाहतुक कारवाईत 1  हजार 404 जणांवर  कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 4 लाख 71 हजाराचा दंड वसुल करण्यात आला आहे.  तसेच 802 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.  तरी नागरीक घराबाहेर पडत आहे या  नियमांचे उल्लघंन केल्याने मुंबई पोलीस कायदा कलम 68/69 अन्वये 326 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सोडून रस्त्यावर विनाकरण  वाहने घेवून फिरणाºया 1 हजार 404 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मॉर्निग वॉकला फिरणा?्या 111 नागरीकांवर कारवाई करण्यात आली असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे यांनी सांगितले.

संचारबंदीच्या कालावधीत  पंढरपूर उपविभागात अवैधरित्या वाळू चोरीचे 13 गुन्हे दाखल करुन   24 जणांना अटक करण्यात आली आहे.  तसेच त्यां ठिकाणाहून 44 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे.  त्याचबरोबर अवैध दारु विक्री व जुगार खेळणाºया 98 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्याकडून एकूण 4 लाख 40 हजार 159 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.

Web Title: Now, the drone will be on civilians, including the most car-savvy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.