coronavirus; आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजावे लागणार ५० रुपये
By appasaheb.patil | Published: March 18, 2020 11:09 AM2020-03-18T11:09:40+5:302020-03-18T11:12:03+5:30
रेल्वे प्रशासनाचा निर्णय; रेल्वे स्थानकावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाय
सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे पुढील आदेश येईपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोलापूर विभागातून धावणाºया ०८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील साईनगर, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, सोलापूर आणि कलबुर्गी प्लॅटफॉर्म तिकीट दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. हे प्लॅटफॉर्म तिकीट प्रतिव्यक्ती १० रुपये होते, मात्र अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी या तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहे़ रेल्वे प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून उपाययोजना केल्या आहेत.
मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर पुढील आदेश येईपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये आकारले जाणार आहेत. पूर्वी १० रुपये तिकीट दर आकारला जात होता. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाड्या करण्यात आल्या रद्द...
- - गाडी क्रमांक ११४१७ पुणे-नागपूर एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक ११४१८ नागपूर-पुणे एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक २२१३९ पुणे-अंजनी एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक २२१४० अंजनी-पुणे एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक ११३०७ कलबुर्गी-सिकंदराबाद एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक ०२१११ सोलापूर-नागपूर एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक ०२११२ नागपूर-सोलापूर एक्स्प्रेस