सोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. वीजपुरवठा, वीजबिल, वीजयंत्रणेची दुरुस्ती आदींबाबत गाºहाणी, प्रश्न, अपेक्षा व अडचणी जाणून घेण्यासाठी आता महावितरणचे अधिकारी वेबिनार व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे थेट ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारीचे निवारण करणार आहेत़ याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून कोणत्या ग्राहकांशी कधी संवाद साधणार याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सुत्राने सांगितले.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ़ नितीन राऊत यांनी ग्राहकांना महावितरणच्या सेवाची माहिती उपलब्ध करून देणे, तक्रारीचे निवारण करणे, कर्मचाºयांच्या अडचणी जाणून घेणे आदींबाबत वेबिनार व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्ह्यांना दिले आहे. या अनुषंगाने पुणे प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विभाग व उपविभागस्तरावर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करावे आणि वीजग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश दिले आहे.
त्यानुसार सोलापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागामार्फत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्राहकांशी वेबिनार व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे थेट संवाद साधण्यासाठीचा यंत्रणा, साधनसामुग्री व विभागनिहाय आराखडा तयार करण्यात येत आहे़ ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची ताबडतोब अंमलबजावणी करून संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भातील निर्देश पडळकर यांनी दिले आहेत.-------------प्रादेशिक संचालक साधणार वीजग्राहकांशी संवाद
सोलापूर शहर व जिल्ह्यातील औद्योगिक व अति महत्वाच्या वीजग्राहकांशी पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधणार आहेत़ याबाबत अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे हे स्वत:त सोलापूर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीजग्राहकांशी संवाद साधणार आहेत़ आम्ही त्यादृष्टीने नियोजन करीत आहोत, व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या आयोजनाची तारीख व वेळेची पूर्वमाहिती लवकरच वीजग्राहकांना कळविण्यात येणार आहे त्यानंतरच संवाद साधणार आहे असे सांगितले.
वादळी वाºयामुळे वीज खंडित
होण्याचे प्रमाण वाढले...मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात वादळी वाºयासह पावसाने जोरदार आगमन होत आहे़ वेगाने वारे सुटल्यास शहरातील विविध भागातील झाड्यांच्या फांद्या तारेवर पडून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे़ याशिवाय वाºयामुळे तारांमध्ये घर्षण होऊन तार तुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे़ दरम्यान, खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे विशेष पथके तैनात करण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.--------------
परवा झालेल्या बैठकीत वीजग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वेबिनार व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याच्या सुचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत़ त्यादृष्टीने सोलापूर विभागात तयारी सुरू करण्यात आली आहे़ कोणत्या ग्राहकांशी कधी संवाद साधायचा, कोणत्या तालुक्यातील ग्राहकांबरोबर कधी संवाद साधायचा याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे़ लवकरच संवाद होईल.- ज्ञानदेव पडळकर,अधिक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर