उजनीवर समुद्रपक्ष्यांची भरली जत्रा, गोड्या पाण्याचा घेत आहेत आस्वाद, मासेमारी करणारे स्थंलारित पक्षीही दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:56 PM2018-02-12T12:56:08+5:302018-02-12T13:12:45+5:30

समुद्रातील खाºया पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनीतील गोड्या पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले आहेत. हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील जलस्थानावर वीण घालून व नेहमी भारतीय उपखंडाच्या पश्चिम व पूर्व सागरी किनारपट्टीवर मत्स्याहार करत उदरनिर्वाह करणारे अनेक प्रकारचे सिंगल अर्थात समुद्रपक्षी उजनीवर हिवाळ्यात दरवर्षी येतात.

The ocean is full of sea-flora, fresh water, and fishing fishery. | उजनीवर समुद्रपक्ष्यांची भरली जत्रा, गोड्या पाण्याचा घेत आहेत आस्वाद, मासेमारी करणारे स्थंलारित पक्षीही दाखल 

उजनीवर समुद्रपक्ष्यांची भरली जत्रा, गोड्या पाण्याचा घेत आहेत आस्वाद, मासेमारी करणारे स्थंलारित पक्षीही दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणातील विस्तृत पाणफुगवठ्यावर मासेमारी करणारे गळ पक्षी दाखल तीन-चार महिन्यांच्या येथील वास्तव्यानंतर मान्सूनच्या प्रारंभी आपल्या वंशाभिवृद्धीसाठी मूळस्थानी परततातसमुद्रातील खाºया पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनीतील गोड्या पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
करमाळा दि १२ : स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी म्हणून परिचित असलेल्या उजनी धरणातील विस्तृत पाणफुगवठ्यावर मासेमारी करणारे गळ पक्षी लक्षणीय संख्येने येऊन दाखल झाले आहेत. नेहमी समुद्रावर वावर असलेले हे मत्स्याहारी पक्षी जलाशयाच्या सर्व भागात आढळून येत आहेत. 
समुद्रातील खाºया पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनीतील गोड्या पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले आहेत. हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील जलस्थानावर वीण घालून व नेहमी भारतीय उपखंडाच्या पश्चिम व पूर्व सागरी किनारपट्टीवर मत्स्याहार करत उदरनिर्वाह करणारे अनेक प्रकारचे सिंगल अर्थात समुद्रपक्षी उजनीवर हिवाळ्यात दरवर्षी येतात. त्यापैकी ब्लॅक हेडेड गल्स सध्या करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली, टाकळी, कात्रज, केत्तूर, शेळगाव, वांगी, कंदर या भागातील जलाशयाच्या पसरलेल्या पाणपृष्ठावर विपुल प्रमाणात वावरताना दिसत आहेत. स्थलांतर करून आलेले हे मत्स्यप्रिय विहंग पुढील तीन-चार महिन्यांच्या येथील वास्तव्यानंतर मान्सूनच्या प्रारंभी आपल्या वंशाभिवृद्धीसाठी मूळस्थानी परततात.
आकाराने ब्राह्मणी घाराएवढे असलेले ब्लॅक हेडेड गल्स सध्या पांढरेशुभ्र वाटतात. परंतु काही दिवसात त्यांच्या डोक्यावर काळा डाग तयार होतो. नंतर उन्हाळ्यात डोक्याचा रंग काळसर तपकिरी होतो. या पक्ष्यांमध्ये पंखातील अग्रभाग पांढरा असतो व त्यांची किनार काळसर असते. चोच पिवळ्या रंगाची असते. चोचीचे अग्रटोक काळसर असते.
---------------------
स्थलांतरित बदकेही मासेमारी करतात : कुंभार
- यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा दर्जा उत्तम झाला असून त्यामुळे माशांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तम प्रतीचे मासे उपलब्ध होत असल्यामुळे या वर्षी गळ पक्षी विपुल प्रमाणात आले आहेत. येत्या काही दिवसांत उजनी जलाशयावर विविध स्थलांतरित बदकेही मासेमारी करण्यासाठी येतील असे मत पक्षी अभ्यासक अरविंद कुंभार यांनी व्यक्त केले़ 

Web Title: The ocean is full of sea-flora, fresh water, and fishing fishery.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.