विठ्ठल रुक्मिणी च्या ऑनलाईन दर्शनाला शंभर रुपये नाममात्र फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:26 PM2019-01-12T15:26:43+5:302019-01-12T15:30:44+5:30
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी च्या दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी शंभर रुपये भाविकांना मोजावे लागणार आहेत. याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या मंदिर ...
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी च्या दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी शंभर रुपये भाविकांना मोजावे लागणार आहेत. याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मागील काही वर्षापूर्वी ऑनलाइन दर्शन बुकिंग सुरु केले होते. यामुळे दर्शन बुकींग करून भाविक त्याच वेळेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येत होते. याचा फायदा प्रत्येक ठिकाणच्या इंटरनेट कॅफे ला होत होता मात्र समितीला यातून काहीच उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यापुढे ऑनलाइन दर्शनासाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे नाममात्र फी घेण्याचा प्रमुख निर्णय घेतला आहे.
या बैठकीसाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पदुलवाड, सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नंडगिरी, हभप ज्ञानेश्वर जळगावकर उपस्थित होते.