ज्यांच्यावर रुग्णांनी फुलं उधळली, ते डॉक्टर होते; जे उपचारासाठीे दाखल झाले, तेही डॉक्टरच होते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:08 PM2020-05-11T15:08:05+5:302020-05-11T15:10:27+5:30
‘सिव्हिल‘मध्ये विरोधाभासाच्या दोन घटना : बरे होऊन बाहेर पडणाºयांकडून कौतुक होत असताना दुसरीकडे तीन डॉक्टर ‘आयसोलेशन’मध्ये..
सोलापूर : येथील शासकीय रुग्णालयाच्या आवारात रविवारी दोन विरोधाभासाची दृश्ये अनुभवायला मिळाली. एकीकडे बरे होऊन बाहेर पडणारे रुग्ण डॉक्टरांवर फुले उधळत होते तर दुसरीकडे कोरोना पेशंट म्हणून एका परिचारिकेसह तीन डॉक्टर आयसोलेशनमध्ये दाखल झाले होते.
शहरात कोरोनाचे सर्वाधिक ४८ रुग्ण आढळून आले. यात पोलीस कर्मचाºयांसह, सरकारी डॉक्टरांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या डॉक्टरच्या संपर्कातील इतर डॉक्टर, नर्स यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यात एक महिला डॉक्टर, नर्स आणि मनपाकडे काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मनपाकडे काम करणारे डॉक्टर मजरेवाडी येथील सहारानगरचे रहिवासी आहेत.
सिव्हिलच्या आयसोलेशन वॉर्डातून रविवारी सर्वाधिक १२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे या परिसरात काहीसे आनंदाचे आणि चिंतेचे वातावरण होते. मनपाचे सर्व दवाखाने, छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार शासकीय रुग्णालयासह राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमातील वैद्यकीय अधिकारी १८ तासांहून अधिक काळ कार्यरत आहेत, परंतु डॉक्टर, नर्स आयसोलेशन वॉर्डात दाखल होत असल्याने सहकाºयांमध्ये कुजबुज सुरू झाली होती. आयसोलेशन वॉर्डात दाखल झालेले डॉक्टर, नर्स कोरोनावर लवकरच मात करतील, असा विश्वास त्यांचे सहकारी व्यक्त करीत होते.
कोरोनामुक्त बारा रुग्ण आनंदात घरी
कोरोना आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांवर डॉक्टर फुले उधळतात; मात्र रविवारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) कोरोनामुक्त झालेल्यांनी डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि पोलिसांवर फुले उधळली. सिव्हिल हॉस्पिटलमधून रविवारी १० मे रोजी १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यापैकी चांगली प्रकृती असणाºया आठ जणांना घरी सोडण्यात आले. तर चार जणांना न्यूमोनिया असल्याने पुढील उपचारासाठी सामान्य वॉर्डात ठेवण्यात आले आहे. घरी सोडण्यात आलेले नागरिक हे रविवार पेठ, नळ बाजार, कुमठा नाका, मोदी, कार्तिक नगर, यशवंत हौसिंग सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, फॉरेस्ट या भागातील प्रत्येकी एक जण आहे. शानदार चौक, तालुका पोलीस स्टेशन, घेरडी (ता. सांगोला), नाथ प्राईड येथे राहणारे चार रुग्ण हे न्यूमोनिया आजार असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेत आहेत.
गुरुवार सात मे पर्यंत एकूण २९ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले होते. रविवारी १२ रुग्ण बरे झाल्याने आता सोलापुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ४१ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांनी टाळ्या वाजवत अभिनंदन केले. तर बरे झालेल्या नागरिकांनी हात जोडत सेवा करणाºया सर्वांचे आभार मानले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी डॉक्टर व इतरांवर फुले उधळल्याने त्याच्या चेहºयावर समाधान दिसत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के, डॉ. विठ्ठल धडके आदी उपस्थित होते.