सोलापुरात कांद्याची आवक वाढली; प्रति क्विंटल भाव मिळाला १२ हजार

By Appasaheb.patil | Published: December 7, 2019 12:30 PM2019-12-07T12:30:57+5:302019-12-07T12:33:17+5:30

७०० ट्रकची आवक; कर्नाटक, आंधप्रदेश, तामिळनाडूतून आला कांदा

Onion arrives in Solapur; The price per quintal was 3 thousand | सोलापुरात कांद्याची आवक वाढली; प्रति क्विंटल भाव मिळाला १२ हजार

सोलापुरात कांद्याची आवक वाढली; प्रति क्विंटल भाव मिळाला १२ हजार

googlenewsNext
ठळक मुद्दे- सोलापुरात कांद्याची आवक वाढली- प्रति क्विंटल १२ हजार रूपये मिळाला भाव- व्यापाºयांनी भाव पाडल्याचा शेतकºयांचा आरोप

सोलापूर : सोलापूरबाजार समितीत शनिवारी कांद्याची आवक मोठया प्रमाणात झाल्याने दरात घसरण झाली़ शनिवारी बाजारात शेतकºयांच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला १२ हजार रूपये असा भाव मिळाला़ शनिवारी बाजार समितीत ५०० ते ७०० ट्रकची आवक झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

शेतकºयांनी साठवणुक केलेला कांदा बाजारात आल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे़ गुरूवारी २० हजार रूपयांचा भाव मिळाल्याची बातती प्रसिध्द झाल्याने मोठया प्रमाणात बाजार समितीत कांदा आल्याचे व्यापाºयांनी सांगितले़ शनिवारी सरासरी चार ते पाच हजार रूपयांपर्यंत भाव मिळाल्याचे दिसून आले़ सोलापूर बाजार समितीत आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया पंधरवड्यापासून कांद्याला चांगला दर मिळत आहे.

राज्यातील अन्य बाजार समित्यांपेक्षा सर्वाधिक दराने कांदा विकला जात आहे. ३० नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९ हजार ५०० रुपयाने कांदा विकला होता. हा दरही अन्य बाजार समित्यांपेक्षा वरचढ होता. डिसेंबर महिन्यात तर दररोज भाव वाढत आहेत. सोमवारी सर्वाधिक प्रतिक्विंटल १३ हजार, मंगळवारी १५ हजार, बुधवारी १५ हजार १०० रुपये तर गुरुवारी तब्बल २० हजार रुपयाने कांद्याचा लिलाव झाला. सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर वाढत असताना अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र दरात फार अशी वाढ झालेली दिसत नाही. 
दरात वाढ झाल्याने बाजार समितीची केवळ कांद्याची १४ कोटी ६३ लाख रुपये उलाढाल झाली़  २२५ ट्रकमधून ४५ हजार १२ पिशव्या कांद्याचे २२ हजार ५०६ क्विंटल वजन झाले. डिसेंबर महिन्यातील तीन दिवसात ३८ कोटी २० लाख ७८ हजार रुपये कांदा विक्रीतून उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
 

Web Title: Onion arrives in Solapur; The price per quintal was 3 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.