साळमुख परिसरात खुलेआम मटका ; कर्जबाजारीपणामुळे प्रपंच उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:31+5:302021-07-29T04:23:31+5:30
साळमुख परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. याचाच फायदा घेत मटका व्यावसायिकांनी ठिकठिकाणी आपले एजंट नेमले आहेत. त्यांच्या ...
साळमुख परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. याचाच फायदा घेत मटका व्यावसायिकांनी ठिकठिकाणी आपले एजंट नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून मटका व्यवसाय सुरू आहे. माळशिरस तालुक्यात साळमुख मटका व्यवसायाचे केंद्र बनू लागले आहे. गतवर्षी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने धाडी टाकून मोठ्या कारवाया केल्या होत्या.
स्थानिक वेळापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी खुलेआम चाललेल्या या अवैध व्यवसायावरती कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्यामुळे साळमुख परिसरातील नागरिक मटका व्यावसायिकांवरती पोलीस अधीक्षकांच्याच पथकाकडून कारवाई केली जावी, ही अपेक्षा करीत आहेत.
---
रोजचे पैसे मटक्यातच
- दररोज शेतीमध्ये मजुरी, बांधकाम व्यवसायावर मजुरी, हमाली, दुकानातील कामगार मालकाकडून दररोज कामाचे पैसे घेऊन मटका खेळून प्रपंचाचे नुकसान करत आहेत. रोजचे पैसे मटक्यातच जात आहेत.
----
मटक्यामुळे वाढती व्यसनाधीनता आणि कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे. साळमुख परिसरात मटका चालविणाऱ्या बुकींवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल.
- भगवान खारतोडे, पोलीस निरीक्षक, वेळापूर