शेतकऱ्यांना विठ्ठल काॅर्पोरेशन लि. यांनी कर्ज काढल्यानंतर बँकेकडून मात्र ते कर्ज फेडण्यासाठी नोटिसा आल्यावर करमाळा तालुक्यात खळबळ उडाली. आ. संजय शिंदे यांना आता हे कर्ज फेडणे भाग आहे.
याबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की आमदार संजय शिंदे यांनी घेऊन जर बँकेशी वन टाईम सेटलमेंट करुन कर्ज रक्कम भरली तर मात्र शेतकऱ्यांच्या भविष्यावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. आ. संजय शिंदे यांना कर्ज फेडण्याशिवाय पर्याय नाही. परंतु त्यांनी वन टाईम सेटलमेंट न करता कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह भरावी व शेतकऱ्याची पत अबाधित ठेवावी. आपण लवकरच जिल्हाधिकारी यांना भेटून या प्रकरणी लक्ष देऊन शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय दुर करण्यासाठी विनंती करणार आहोत. परंतु सध्या आणखी नवीन माहिती बाहेर पडतेय, शेतकरी विविध बँकांकडून आलेल्या नोटिसा मला दाखवत आहेत. ही सर्व माहिती संकलित करुनच आपण पुढील निर्णय घेणार आहोत व वेळप्रसंग पडल्यास न्यायालयात सुध्दा हे प्रकरण दाखल करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.