शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उदघाटन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे, माजी झेडपी सदस्य झुंजारनाना भांगे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, डॉ. सदानंद व्हनकळस उपस्थित होते.
आ. बबनराव शिंदे यांच्या निधीतून ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, लवकरच याचे काम पूर्ण होणार आहे. या ठिकाणी तीस रुग्णांची सोय होणार आहे. यावेळी डाॅ. विद्यादेवी तोडकरी, अशोक लुणावत, दिनेश गाडेकर, सचिन चवरे, दत्तात्रय अंबुरे, बाळासाहेब चव्हाण, बंटी गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
१ मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाची सोय नगरपंचायती समोरील झेडपीच्या मराठी शाळेत करण्यात येणार आहे.
-----------
२८माढा
शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस नगराध्यक्षा मिनल साठे,माजी झेडपी सदस्य झुंजारनाना भांगे आदी उपस्थित होते.