पंढरपूर, आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आळंदीवारी वारीचा निर्णय कळवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:36 AM2020-12-04T11:36:59+5:302020-12-04T11:37:39+5:30

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती; नाना पटोले यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

Pandharpur, Alandi inspection, then we will inform the decision of Alandiwari Wari only after discussing with the Chief Minister | पंढरपूर, आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आळंदीवारी वारीचा निर्णय कळवू

पंढरपूर, आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आळंदीवारी वारीचा निर्णय कळवू

Next

पंढरपूर : प्रथम पंढरपूर व आळंदी देवस्थानची पाहणी करणार आहे. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून व प्रमुख महाराज मंडळींशी चर्चा करून आळंदी येथील यात्रेबाबत निर्णय कळवू असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे व संत चोखामेळा महाराजांचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे पटोले म्हणाले, पंढरपूर हे राज्याचे गौरव स्थान आहे. वारकरी ही संस्कृती आहे. पंढरपूर  देवस्थान, विकास व व्यवस्थेचे भविष्यात काही नुकसान होणार नाही. त्या संदर्भात विधान भवनात बैठक लावणार आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मंदिर समितीचे अधिकारी वारकरी व अन्य मंडळी उपस्थित राहतील असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

अधिवेशनासाठी नवीन नियमावली

सध्या कोरानाचे संकट संपले नाही. अधिवेशनासाठी जादा लोक येतील. अनेक प्रश्नांवर लोक एकत्र येतील. प्रश्न मार्गी लागावे यासाठी लोक आंदोलन करतात. यामुळे कोरानाचा संसर्ग वाढू शकतो. परंतु दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसे चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरू आहे.

केंद्र सरकार तातडीने काढावा तोडगा

केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतमजूरांच्या विरोधात केंद्र सरकारने कृषीविषयक विधेयक पास केले आहे. मजूर व इतर शेती संबंधित कामगार यांच्या विरोधात विधेयक पास करून सर्व सामान्य शेतकऱ्याची गळचेपी करणारे विधेयक आहे. यामुळे सर्व देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याच्या अनुशंगाने जे दिल्लीमध्ये सर्व राज्यातून शेतकरी वर्ग जमा झाला आहे. सध्या दिल्लीत खूप थंडी आहे. लाखो शेतकरी रस्त्यावर केंद्र सरकार तातडीने तोडगा काढावा असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Web Title: Pandharpur, Alandi inspection, then we will inform the decision of Alandiwari Wari only after discussing with the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.