पंढरपूर तालुक्याला अतिवृष्टीच्या ५८ कोटीची मदत प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:51+5:302020-12-11T04:48:51+5:30

पंढरपूर : ...

Pandharpur taluka receives assistance of Rs. 58 crore for excess rainfall | पंढरपूर तालुक्याला अतिवृष्टीच्या ५८ कोटीची मदत प्राप्त

पंढरपूर तालुक्याला अतिवृष्टीच्या ५८ कोटीची मदत प्राप्त

Next

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. ५५ गावातील बाधितांना अनुदान वितरण होणार आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीला महापूर आला होता. तसेच अतिवृष्टी झाल्याने शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले होते. जनावरेसुद्धा दगावली. तालुक्यासाठी जवळपास ९८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणे गरज निर्माण झाली होती. राज्य शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे. ५८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचे वितरण सुरू झाले आहे. दोन दिवसात बहुतांश बाधितांच्या खात्यावर बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच उर्वरित ४० कोटी रुपये मिळणार आहेत.

Web Title: Pandharpur taluka receives assistance of Rs. 58 crore for excess rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.