पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:52 AM2019-08-07T11:52:20+5:302019-08-07T11:57:17+5:30

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; रेस्क्यू पथकाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी केले स्पष्ट

In Pandharpur, three people were injured in old malasirs | पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

googlenewsNext
ठळक मुद्देवीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेलेधोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आलामाळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली

सोलापूर : वीर व उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील ४० गावांतील ७ हजार ६८७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

उजनी धरणातून सुमारे एक लाख क्युसेकच्या पुढे पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या ४४ गावांतील १८७८ कुटुंबांचे शाळा, मंदिर, सभामंडपात स्थलांतर केले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या गावनिहाय नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूर तालुका- सुस्ते: ४००, अंबाबाई पटांगण: १०९, पिराची कुरोली: १७५, व्यास नारायण झोपडपट्टी: १0३0, लखुबाई मंदिर परिसर: १0१२, पुळूज: ५३४, पुळूजवाडी: ५८, विटे: ३३२, खरसोळी: ७0, पोहेरगाव: ७३८, तारापूर: ५९, अजनसोंड: ८0, पटकुरोली: १६, खेडभोसे: ८६, देवडे: ६५, गुरसाळे: ९0, शेगाव दुमाला: ३४, भटुंबरे: १९, देगाव: १७३, कान्हापुरी: १७, कºहाळे: ८८, आव्हे: २२६, नांदोेरे: ५२, तरटगाव भोसे: २८२, शेळवे: ४२,खेडभाळवणी: ३२, चळे: २२८, आंबे: २१0, सरकोली: ३४0, वाडीकुरोली: १९0, होळे: २0५. अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील ३१ गावांमधील १७४७ कुटुंबांतील ६९९२ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

वीर धरणातील पाण्यामुळे निरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील ९ गावांतील १३१ कुटुंबांतील ६९५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये कुरभावी: १९, एकशिव: ६, पळसमंडल: ५५, कदमवाडी: २७, उंबरे: ११९, तिरवंडी: ८५, आनंदनगर: ८, अकलूज: ३५0, बिजवडी: २६.  उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांना  सतर्क करण्यात आले आहे. पुराचा धोका असणाºया वाड्यावस्त्यांवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले  आहे.

अशी राबविली यंत्रणा
- वीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापुरातील १५ आणि अक्कलकोट तालुक्यातील १0 गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा आदींची सोय संबंधित तहसीलदारांमार्फत करण्यात आली आहे. पुराच्या पाण्याने गंभीर हानी झाल्याचे एकही वृत्त नसल्याचे जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून सांगण्यात आले. 

Web Title: In Pandharpur, three people were injured in old malasirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.