९ जानेवारीला पंतप्रधानांचा दौरा; सोलापुरात येणारे नरेंद्र मोदी देशाचे पाचवे पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:50 AM2019-01-03T10:50:48+5:302019-01-03T10:53:03+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी सोलापूरला येणारे नरेंद्र मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी सोलापूरला येणारे नरेंद्र मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ जानेवारी रोजी सोलापूर दौरा जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. अद्याप पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे ठिकाण निश्चित झालेले नाही. होम मैदान यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यायी चार जागांची पाहणी करण्यात आली आहे.
आता सुरक्षेच्या तपासणीवरून पोलिसांकडून या जागेबाबत हिरवा कंदील आल्यावर सभेचे ठिकाण निश्चित होणार आहे. सिद्धेश्वर कारखान्याजवळील जागा सर्वांना पसंत असल्याचे नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा भाजप पदाधिकाºयांची गुरूवारी शिवस्मारक येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सभेसाठी कोणती जागा निश्चित केली हे कळणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आधी चार पंतप्रधानांचा सोलापूरला दौरा झाला आहे. १२ एप्रिल १९६0 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूर दौºयावर आले होते. या दौºयात त्यांनी स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण केले. १९६५ मध्ये दुसºया दौºयात सेटलमेंट कॉलनीला इंग्रज सरकारने घातलेले क्षेत्रबंधन उठविले होते.
त्यानंतर १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरचा दौरा केला होता. सोलापूर लोकसभेसाठी सूरजरतन दमाणी व पंढरपूरसाठी संदिपान थोरात हे उमेदवार होते. होम मैदानावर त्यांची सभा झाली होती. १९८७ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांचा दौरा झाला होता. यावेळी त्यांनी सेटलमेंट कॉलनीतील रहिवाशांना मोफत नळ आणि डोणगाव रोडवरील सायकल कारखान्याचे भूमिपूजन केले होते.
२00६ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग हे विडी घरकूल येथील गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या घरकू ल व पॉवर ग्रीडच्या शुभारंभासाठी आले होते. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी सोलापूर दौºयावर येत आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही आले होते मोदी
- गुजरातचे मुख्यमंत्री असताना विजयपूर दौºयावरून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी होम मैदानावर प्रचार सभा झाली होती. याचबरोबर व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा हे पंतप्रधान पदावर नसताना सोलापुरात येऊन गेले होते, हे येथे उल्लेखनीय.