सदर काव्यमहोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. मिलिंद शेजवळ भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ए. डी. जोशी, ज्येष्ठ कवी प्रा. अशोक शिंदे, मुंबईचे कवी, गीतकार विजय फडणीस उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणी निवेदक प्रशांत जोशी, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्यसचिव कालिदास चवडेकर, बाळासाहेब तोरस्कर, सीमा भांदर्गे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
रविवार, ६ जून २०२१ सकाळी १० वाजता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाच्या गौरवार्थ शिवकाव्यांचे सादरीकरण होणार आहे.? त्यानंतर रात्री ८ पर्यंत उर्वरित सत्रे होणार आहेत. सदर कार्यक्रम खुल्या स्वरूपात असून समारंभ सुरू होण्याच्या वेळेपूर्वी http://meet.google.com/nwb-utfm-kns या दुव्यावर टिचकी मारून रसिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काव्यप्रेमीच्यावतीने केले आहे.?