पंढरपूर : माघी वारीसाठी पंचमीपासूनच पंढरपुरातील मठा मठामध्ये वारकरी दाखल झाले आहेत. वारकऱ्यांना मठा बाहेर काढण्याचे प्रयत्न करू नये. वारकरी संतापतील अशी कोणती ॲक्शन शासनाने घेऊ नये. पोलिसांनी वारकऱ्यांच्या बाबतीत आपली भूमिका सौम्यच ठेवावी. उद्या कदाचित आम्ही मठातील सर्व वारकरी पंढरपुरामध्ये एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर तो शासनाच्या अंगलट येईल असा इशारा ह. भ. प. बंडा तात्या कराडकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
पुढे कराडकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या चार प्रमुख वाऱ्या आहेत. आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री आहे. त्यापैकी माघी वारी चालू आहे. समाजाच्या आरोग्याची दक्षता घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु त्याचबरोबर पंचमी, शष्टी पासून प्रत्येक मठामध्ये वारकरी येऊन राहीले आहेत. त्या वारकऱ्यांना पोलीस मठातून पोलीस उसकाऊन काढत असतील तर ते योग्य नव्हे. कोरोनाची काळजी घेतली पाहीजे. याबाबत कोणतेही दुमत नाही. परंतु आपल्याला संचारबंदी करायचीच होती तर, पंचमीपासून वारकऱ्यांना पंढरपुरात येऊच द्याच नव्हत. वारकऱयांचा प्रक्षोभ होईल अशी कृती पोलिसांनी करू नये. अन्यथा वारकरी बाहेर पडले तर सरकारांच्या अंगलट येईल असा थेट इशारा ह. भ. प. बंडा तात्या कराडकरांनी दिलाय.
◼️पक्षांच्या कार्यक्रमाला वारीसारखी गर्दी
मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्याना गर्दी होते . ती चालते मग वारीलाच विरोध का ? असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्याना गर्दी होते . ती चालते मग वारीलाच विरोध का ? असा सवाल ह. भ. प. बंडा तात्या कराडकरांनी सरकारला विचारलाय.