याबाबत दिग्विजय बागल म्हणाले, करमाळा तालुक्यातील अनेक दुग्ध संस्थांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव दिला आहे. या संस्थांनी मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले आहे. आज जिल्हा दूध संघाची वाहने अनेक गावात जात नसल्यामुळे दूध संकलन करणे अवघड झाले असले तरी या सहकारी दुग्ध संस्था आजही जिल्हा दूध संघाला जोडल्या आहेत. या संस्था नोंदणी रद्द करण्याच्या आदेशावर स्थगिती आणून या संस्था वाचवणे हाच उद्देश होता. दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी या विषयात लक्ष घालून संस्था नोंदणी रद्द करण्याचा आदेश योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी या आदेशावर स्थगिती दिली आहे.
या स्थगितीच्या माध्यमातून चेअरमन, सचिव आणि सभासद शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यापुढे ही सहकार चळवळ वाचण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे बागल म्हणाले.
कोट :::::
सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांनी तालुक्यातील ७६ दुग्ध संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिला. यामुळे सर्व चेअरमन, सचिव, सभासद यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. अनेक चेअरमन, सचिव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत सांगितले. यामुळे आपण थेट दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन हा आदेश चुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर मंत्री केदार यांनी नोंदणी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
- दिग्विजय बागल,
चेअरमन, मकाई साखर कारखाना