वीज तारांचा स्पार्क; सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:34 PM2019-05-08T12:34:13+5:302019-05-08T12:36:27+5:30

दक्षता म्हणून महावितरणकडून सात गावचा वीजपुरवठा खंडित

Power tar spark; Solapur Municipal corporation's garbage deppola fire | वीज तारांचा स्पार्क; सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग 

वीज तारांचा स्पार्क; सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग 

googlenewsNext
ठळक मुद्देउन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे हालआग आटोक्यात आणण्यासाठी अनिशामक दलाच्या कर्मचाºयांना शर्थीचे प्रयत्न

सोलापूर  : महावितरणच्या वीज तारांचा स्पार्क झाल्यामुळे महापालिकेच्या तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला मंगळवारी दुपारी एकच्या सुमाराला आग लागली. अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांनी सायंकाळपर्यंत ४० फेºया करून पाण्याचा मारा केला. तरीही आग आटोक्यात आली नव्हती. कचरा डेपोच्या परिसरातून विजेच्या अतिउच्च दाबाच्या तारा गेल्या आहेत. दक्षता म्हणून या भागातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे म्हणाले, कचरा डेपोला दुपारी साडेबारा-एकच्या सुमाराला आग लागली. महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या तारातून स्पार्क होऊन ठिणग्या कचºयावर पडल्या. कचºयाने पेट घेतला. धुराचे लोट आले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या. 

या भागातील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात आला. सायंकाळी सहापर्यंत जवळपास ५ गाड्यांद्वारे ४० फेºया करून पाण्याचा फवारा मारण्यात आला, परंतु आग आटोक्यात येत नव्हती. रात्री अंधार आणि धुरामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. वाºयामुळे आग पसरत होती. या धुराचा परिणाम परिसरातील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आग आटोक्यात आली तरी धुराचे लोट कमी व्हायला वेळ लागणार आहे. 

जेसीबीच्या सहायाने या ठिकाणी कचरा बाजूला करुन रस्ता करण्यात आला. त्यातून पाण्याच्या गाड्या नेण्यात आल्या. या आगीची झळ कचरा प्रक्रिया प्रकल्पाला बसण्याची शक्यता असून त्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी रात्री या प्रकल्पाच्या बाजूने आग विझविण्यास सुरुवात केली होती, असे केदार आवटे यांनी सांगितले. 

कचºयांमध्ये मिथेन वायू असतो. या वायूमुळे कचरा आणखी पेट घेतो. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण आग आटोक्यात आणण्यासाठी अनिशामक दलाच्या कर्मचाºयांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त, मनपा. 

या गावांना बसली झळ 
- कचरा डेपोला आग लागल्यानंतर त्याची झळ विजेच्या तारांना बसू शकते, असा फोन महापालिकेच्या उपायुक्तांनी केला होता. वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी तत्काळ या भागातील  हगलूर, उळे, कासेगावसह सात गावचा वीजपुरवठा खंडित केला होता, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. उन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे हाल झाले. 

Web Title: Power tar spark; Solapur Municipal corporation's garbage deppola fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.