------
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिलीपराव माने गटाचे प्रमोद शरणाप्पा सूर्यवंशी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामस्थांतून थेट सरपंचपदावर निवडून आलेल्या अनिल पाटील यांच्याविरोधात ग्रामपंचायतीच्या दाखल केलेला अविश्वास ठराव ६ विरुद्ध १ मताने मंजूर झाला होता. या ठरावाला विशेष ग्रामसभेची मंजुरी घेण्यासाठी संपूर्ण गावांतील मतदान घेण्यात आले. अवघ्या तीन मतांनी अनिल पाटील यांच्याविरोधात ग्रामस्थांनी कौल दिला. बुधवारी (दि.१८) ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत प्रमोद सूर्यवंशी यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. सभेला परसप्पा बगले, प्रमोद सूर्यवंशी, मीनाक्षी पाटील, शांताबाई स्वामी, संगीता सूर्यवंशी हे पाच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर विरोधी गटाच्या दोन सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. बिनविरोध निवडीसाठी चन्नप्पा बगले, पंडित पुजारी, धरेप्पा पाटील, शिवपुत्र पाटील, समीर बिराजदार, यल्लाप्पा बिराजदार, सैपन बिराजदार, संगय्या स्वामी, रविकांत पाटील, संगप्पा बगले, राजकुमार बगले, प्रकाश बगले, कृष्णा कोळी, अंबण्णा सूर्यवंशी, सुखदेव सूर्यवंशी आदींनी प्रयत्न केले.
----
फोटो ओळी
कुडलच्या सरपंचपदी प्रमोद सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.