"आठवले संधिसाधू, तर प्रकाश आंबेडकर धरसोड वृत्तीचे"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 09:18 PM2019-02-13T21:18:28+5:302019-02-13T21:19:29+5:30
दलित साहित्य आणि चळवळीमुळे दलितांचं मोठं नुकसान झालं आहे.
सोलापूर- दलित साहित्य आणि चळवळीमुळे दलितांचं मोठं नुकसान झालं आहे. दलित साहित्य आणि चळवळीमुळे जातीयवाद वाढीस लागला आहे. त्यामुळे मी दलित साहित्य वाचत नाही, तसेच दलित चळवळही मानत नसल्याचं अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत वातावरण दूषित आहे. अनेकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी गुंतागुंत वाढत चालली आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंवरही टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून जनतेत लोकप्रिय आहेत. परंतु प्रकाश आंबेडकर हे धरसोड वृत्तीचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी केव्हाच सोडून दिले आहेत, अशी टीका गज्वी यांनी केली आहे, तर आठवले हे संधिसाधू असल्याचंही ते म्हणाले आहेत. केंद्रात मंत्रिपद मिळालं म्हणजे सर्वकाही मिळालं असं नव्हे. रामदास आठवले हे संधिसाधू आहेत, असं म्हणत प्रेमानंद गज्वींनी आठवलेंवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे निर्णय घेतात आणि तोंडावर आपटतात. तर नितीन गडकरी हे फारच कष्टाळू असल्याचं प्रेमानंद गज्वी म्हणाले आहेत.