सिल्व्हर ज्युबिलीमध्ये पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:14+5:302021-03-05T04:22:14+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत केवळ इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमास उपस्थित राहण्यास परवानगी दिली. प्रास्ताविक ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत केवळ इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमास उपस्थित राहण्यास परवानगी दिली. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनी केले.
डॉ. सचिन करळे, प्रा. विद्या खाडे-जायभाय यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी १० वी परिक्षेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी सिध्दी माळी, वैष्णवी गुंड, ईश्वरी कोकाटे यांना पारितोषिक देऊन गौरविले. ५ वी व ८ वी शिष्यवृत्तीधारक तनिष्का फल्ले, जान्हवी पाटील, विस्मील्ला करमाळकर, सीमरन जानराव, यशश्री कुलकर्णी व रजनी पडवळ यांचाही गौरव केला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त जळगाव येथील संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या प्रगती गोंदकर हिचा ही गौरव केला.
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिरुध्द चाटी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सतीश होनराव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शिवराज भटुळे व गणेश ऐनापुरे यांनी करुन दिला. आभार पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर यांनी मानले.
फोटो
०४बार्शी-स्कूल
ओळी
बार्शीतील सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सचिन करके, प्रा. विद्या खाडे-जायभाय, प्रशांत कोल्हे आदी.