विठ्ठलराव शिंदे कारखान्यात १४ लाख ५५ हजार साखरेचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:17+5:302021-03-05T04:22:17+5:30
व संचालक वेताळ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक पोपट गायकवाड, विष्णू हुंबे, पोपट चव्हाण, लाला मोरे, नीळकंठ ...
व संचालक वेताळ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संचालक पोपट गायकवाड, विष्णू हुंबे, पोपट चव्हाण, लाला मोरे, नीळकंठ पाटील, सुरेश बागल, संदीप पाटील, पांडुरंग घाडगे व विभागप्रमुख संभाजी थिटे, सी.एस. भोगाडे, पोपटराव येलपले, सुनील बंडगर, सुनील शिंदे, पांडुरंग बागल, फारुक दुंगे, जगदीश देवडकर, शशिकांत पवार उपस्थित होते.
चेअरमन आ. बबनराव शिंदे म्हणाले, चालू हंगामात १२९
दिवसांत पिंपळनेर युनिट १ मध्ये १४ लाख ८९ हजार ७८७ टन उसाचे गाळप करून १४ लाख ५६ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. रिकव्हरी ११.२० टक्के आहे. आर्थिक अडचण असूनही ३० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांचे २ हजार रुपये प्रतिटनाप्रमाणे बिल दिले आहे. कारखान्याची एफआरपी २,३७५ रुपये आहे. प्रत्येक १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या उसाचे बिल जमा केले आहे.
पुढील हंगामात २५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
२०२१- २२ या हंगामासाठी २५ हजार हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे झाली आहे. त्यामुळे या हंगामात २५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा कारखान्याचा उद्देश आहे. यापुढे उसापासून थेट इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचा आमचा मानस
आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी गळीत
हंगामाचा आढावा सादर केला. संचालक वेताळ जाधव यांनी आभार मानले.
फोटो
०४विठ्ठलराव शिंदे कारखाना
ओळी
विठ्ठलराव शिंदे कारखान्याने उत्पादित केलेल्या १४ लाख ५५ हजार ५५५ व्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी चेअरमन आ. बबनराव शिंदे यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी व सभासद.