बोगस पदवीव्दारे मिळवली पदोन्नती; सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांचा शोध सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:29 PM2020-01-03T13:29:38+5:302020-01-03T13:31:56+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची माहिती; आरोग्य, शिक्षण विभागाचाही आढावा घेणार

Promotion earned by a bogus degree; Search for employees of Solapur Zilla Parishad | बोगस पदवीव्दारे मिळवली पदोन्नती; सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांचा शोध सुरू 

बोगस पदवीव्दारे मिळवली पदोन्नती; सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांचा शोध सुरू 

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम खात्यातील ५५ कर्मचाºयांनी बोगस पदव्या धारण करून पदोन्नती मिळविल्याचे निदर्शनाला आलेतत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेमुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी बांधकाम विभागाकडून अशा कर्मचाºयांबाबत माहिती मागितली

सोलापूर :  जिल्हा परिषदेत बोगस पदवी धारण करून पदोन्नती मिळविलेल्या कर्मचाºयांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

जिल्हा परिषदेच्या २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत उमेश पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. बांधकाम खात्यातील ५५ कर्मचाºयांनी बोगस पदव्या धारण करून पदोन्नती मिळविल्याचा आरोप त्यांनी केल्यामुळे खळबळ उडाली होती. 

झेडपीच्या सेवेत असताना कॉलेजमध्ये दररोज उपस्थित राहून या कर्मचाºयांनी पदव्या कशा मिळविल्या अन् त्यांना पदोन्नती कोणत्या आधारावर देण्यात आली याची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. विरोधी  पक्षनेते बळीराम साठे यांनी फक्त बांधकाम खातेच काय इतर खात्यातही अशा अनेक भानगडी असल्याचे निदर्शनाला आणले होते. यावर तत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 

सभेतील चर्चेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी बांधकाम विभागाकडून अशा कर्मचाºयांबाबत माहिती मागितली आहे. कार्यकारी अभियंता कदम यांनी अशाप्रकारे पदोन्नती झालेल्या कर्मचाºयांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. प्राथमिक चौकशीत असे १५ कर्मचारी असल्याचे आढळले आहे. 

याबाबत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सुभाष माने यांनी अनेक शिक्षकांनी कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र देऊन पदोन्नती मिळविल्याचे निदर्शनाला आणले होते तर वसंतनाना देशमुख यांनी तर आरोग्य खात्यातही मोठ्या भानगडी असल्याचा आरोप केला होता. नुसते बांधकाम नव्हे तर शिक्षण व आरोग्य खात्यातील पदोन्नतीची चौकशी केली जाणार असल्याचे वायचळ यांनी स्पष्ट केले. 

निधी खर्चाला प्राधान्य
- प्रशासनाच्या हातात आता केवळ तीन महिने राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाकडे आलेल्या निधीचा व खर्चाचा आढावा घेतला जात आहे. विविध योजनांसाठी आलेला निधी जास्तीतजास्त खर्च व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच विभागाकडून फायली मागविण्यात येत आहेत. मुख्य लेखा विभागालाही खर्चाबाबत आढावा घेण्यासाठी विभागप्रमुखांना सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. 

Web Title: Promotion earned by a bogus degree; Search for employees of Solapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.