यात्रा अनुदानातून मालमत्ता कर माफ करावा : धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:22 AM2021-03-17T04:22:41+5:302021-03-17T04:22:41+5:30
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी अशा चार मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र ...
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी अशा चार मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतिवर्षी पाच कोटी रुपयांचे पंढरपूर नगरपरिषदेस अनुदान प्राप्त होते. यंदाही पाच कोटी रुपयांचे अनुदान नगरपालिकेला मिळाले आहे. मात्र कोरोनामुळे वर्षभरात कुठलीही यात्रा झाली नाही. त्यामुळे या अनुदानातील एकही रुपया खर्ची पडला नाही. यामुळे पालिकेने रस्त्यांसाठी अनुदानाची रक्कम खर्च न करता शहरातील मालमत्ताधारकांचा नगरपालिका कर या रकमेतून माफ करावा, अशी मागणी दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
कोट ::::::::::::::
पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावर सिमेंट रस्ता व्हावा. यासाठी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहोत. राज ठाकरे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणीही करणार आहे.
- दिलीप धोत्रे
राज्य सरचिटणीस, मनसे