सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण

By admin | Published: March 17, 2017 03:59 PM2017-03-17T15:59:12+5:302017-03-17T15:59:12+5:30

सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण

The proportion of girls born in Solapur | सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण

सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण

Next

सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण
जिल्हाधिकारी: गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करणार
सोलापूर: सोलापूर शहरात १२७ आणि ग्रामीण भागात १४४ सोनोग्राफी सेंटर्स आहेत़ वारंवार या सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात येते़ सध्या सोलापूर जिल्ह्यात १००० बालकांमध्ये ९०० मुली जन्मतात़ ही प्रमाण चांगले असले तरी काही तालुके डेंजर झोनमध्ये आहेत़ त्या ठिकाणी वॉच ठेऊन गर्भपात करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले़
राज्याच्य सन २०११ च्या जनगणनेनुसार उपलब्ध आकडेवारीनुसार बाललिंग गुणोत्तर चे प्रमाण ८९४ एवढे नोंदविले असून ही गंभीर बाब आहे़ २००१ च्या जनगणनेनुसार ही प्रमाणे कमी झाल्यामुळे त्यावेळेपासून पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे़ असे असताना देखील मिरज येथील म्हैसाळ तालुका येथे डॉ़ बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रणजीत कुमार, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ शितल जाधव, मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ़ जयंती आकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ मल्लीकार्जून पट्टणशेट्टी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात जनजागृतीसाठी काय काय केले जाते याची माहिती दिली़
सन २०१३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण सरासरी ८८२ होते़ सन २०१४ मध्ये ते ८९७ झाले असून सन २०१५ मध्ये ९०२ आणि गतवर्षी सन २०१६ मध्ये ९०१ एवढे आहे़ म्हणजे मुलींचे प्रमाण अजूनही कमीच आहे़ जिल्ह्यात वर्षभरात ७१९४६ प्रसुती झाल्या असून यात ३७८५६ एवढे पुरुष आणि ३४०९० एवढे स्त्री बालके जन्मली असून हे गुणोत्तर प्रमाण ९०१ एवढे आहे़ कोणत्याही ठिकाणी अनाधिकृत गर्भपात केला जात असल्यास १०४ किंवा १८००२३३४४७५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी़ या कायद्याचे उलंघन केल्याचे निदर्शनास आणून देणाऱ्यास २५ हजार रुपये बक्षीस द्यावे अशी कायद्यात तरतूद केली आहे़
गर्भलिंग निवडीविरोधात तक्रार नोंदणविण्यासाठी ह्यआमची मुलगीह्ण या शासनाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या तक्रारींची देखील दखल घेऊन कारवाई केली जाते़ शहर आणि जिल्हास्तरावर कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घ्यावी, माध्यमांना माहिती द्यावी, उल्लंघन करणाऱ्याविरुध्द न्यायालयीन कारवाई करावी आदी विविध सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या़

-----------------------------

लिंग गुणोत्तर प्रमाण तालुकनिहाय (२०१६)
उत्तर सोलापूर- ९१९, बार्शी-९१७, माळशिरस-९१४, मंगळवेढा-९०८, अक्कलकोट ९०४, सांगोला-८९७, माढा-८७७, पंढरपूर ८७७, करमाळा-८६६, मोहोळ-८६५, द़ सोलापूर- ८५७
माढा, पंढरपूर, करमाळा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यात मुली जन्माचे प्रमाण चिंताजनक आहे़ त्यामुळे आरोग्य यंत्रणेने याकामी लक्ष देण्याची गरज आहे़

Web Title: The proportion of girls born in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.