शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण

By admin | Published: March 17, 2017 3:59 PM

सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण

सोलापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाणजिल्हाधिकारी: गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करणारसोलापूर: सोलापूर शहरात १२७ आणि ग्रामीण भागात १४४ सोनोग्राफी सेंटर्स आहेत़ वारंवार या सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात येते़ सध्या सोलापूर जिल्ह्यात १००० बालकांमध्ये ९०० मुली जन्मतात़ ही प्रमाण चांगले असले तरी काही तालुके डेंजर झोनमध्ये आहेत़ त्या ठिकाणी वॉच ठेऊन गर्भपात करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले़राज्याच्य सन २०११ च्या जनगणनेनुसार उपलब्ध आकडेवारीनुसार बाललिंग गुणोत्तर चे प्रमाण ८९४ एवढे नोंदविले असून ही गंभीर बाब आहे़ २००१ च्या जनगणनेनुसार ही प्रमाणे कमी झाल्यामुळे त्यावेळेपासून पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे़ असे असताना देखील मिरज येथील म्हैसाळ तालुका येथे डॉ़ बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रणजीत कुमार, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ शितल जाधव, मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ़ जयंती आकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ मल्लीकार्जून पट्टणशेट्टी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात जनजागृतीसाठी काय काय केले जाते याची माहिती दिली़ सन २०१३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण सरासरी ८८२ होते़ सन २०१४ मध्ये ते ८९७ झाले असून सन २०१५ मध्ये ९०२ आणि गतवर्षी सन २०१६ मध्ये ९०१ एवढे आहे़ म्हणजे मुलींचे प्रमाण अजूनही कमीच आहे़ जिल्ह्यात वर्षभरात ७१९४६ प्रसुती झाल्या असून यात ३७८५६ एवढे पुरुष आणि ३४०९० एवढे स्त्री बालके जन्मली असून हे गुणोत्तर प्रमाण ९०१ एवढे आहे़ कोणत्याही ठिकाणी अनाधिकृत गर्भपात केला जात असल्यास १०४ किंवा १८००२३३४४७५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी़ या कायद्याचे उलंघन केल्याचे निदर्शनास आणून देणाऱ्यास २५ हजार रुपये बक्षीस द्यावे अशी कायद्यात तरतूद केली आहे़ गर्भलिंग निवडीविरोधात तक्रार नोंदणविण्यासाठी ह्यआमची मुलगीह्ण या शासनाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या तक्रारींची देखील दखल घेऊन कारवाई केली जाते़ शहर आणि जिल्हास्तरावर कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घ्यावी, माध्यमांना माहिती द्यावी, उल्लंघन करणाऱ्याविरुध्द न्यायालयीन कारवाई करावी आदी विविध सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या़ -----------------------------

लिंग गुणोत्तर प्रमाण तालुकनिहाय (२०१६)उत्तर सोलापूर- ९१९, बार्शी-९१७, माळशिरस-९१४, मंगळवेढा-९०८, अक्कलकोट ९०४, सांगोला-८९७, माढा-८७७, पंढरपूर ८७७, करमाळा-८६६, मोहोळ-८६५, द़ सोलापूर- ८५७ माढा, पंढरपूर, करमाळा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यात मुली जन्माचे प्रमाण चिंताजनक आहे़ त्यामुळे आरोग्य यंत्रणेने याकामी लक्ष देण्याची गरज आहे़