लॉकडाऊनकाळातील वीज बिल माफ करण्याची जनहितची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:23+5:302021-07-07T04:27:23+5:30
सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतकरी, व्यवसायधारक व घरगुती ग्राहक यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने ...
सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतकरी, व्यवसायधारक व घरगुती ग्राहक यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने प्रभाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
या मागणीसंदर्भात देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. ही मागणी मान्य न झाल्यास १९ जुलैला आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊन शेतकरी, व्यवसायधारक व घरगुती ग्राहक आर्थिक संकटात सापडला आहे. अशास्थितीत शासनाने चालू वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम थांबवून थकीत वीजबिल वसुलीचा तगादा थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५ हजार प्रोत्साहनपर देणार, असे जाहीर केले होते.
ते त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेने केली आहे.
यावेळी उपस्थित जनहितचे कार्याध्यक्ष रवींद्र मुठाळ, जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, चंद्रकांत निकम, सुरेश नवले, युवक जिल्हाध्यक्ष रघु चव्हाण, विकास जाधव, बलभीम माळी, पप्पू दत्तु, बाळासाहेब नागणे, बिरूदेव ढेकळे, धर्मराज पुजारी, सुनील पुजारी उपस्थित होते.
------
----