पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुबर उकिरडे यांनी पदभार स्वीकारताच होम टाऊन बार्शीपासून कार्यक्रमाची सुरुवात केली. बार्शी शहरातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची आढावा बैठक येथील सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये पार पडली. कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाप्रमाणे २३ नोव्हेंबरपासून आजअखेर व प्रथम सत्रातील शाळांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. ऑनलाइन, ऑफलाइन विद्यार्थी उपस्थिती नोदली गेली. CBSE/ICSE या अभ्यासक्रमाची शिक्षकांनी ओळख करून घेऊन त्याचाही आपल्या विद्यार्थ्यांना फायदा करून दिला तरच NEET व JEE सारख्या परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी चमकतील. विद्यार्थी हिताला प्राधान्य देत शाळांनी आपला स्वतःचा ‘पॅटर्न’ विकसित केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांकडून कामकाजाचा गोषवारा बाशी नगर परिषदेचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे यांनी घेतला. पर्यवेक्षक संजय पाटील यांनी आभार मानले.
मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनी गुणवत्ता वाढीचे आश्वासन दिले. शहरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.