रेल्वे तिकीट दरवाढीचा निषेध
By admin | Published: June 24, 2014 01:36 AM2014-06-24T01:36:16+5:302014-06-24T01:36:16+5:30
माकपची निदर्शने : दरवाढ मागे घेण्याची मागणी
सोलापूर : रेल्वे तिकीट दरात १४.२ टक्के वाढ केल्याच्या निर्णयाचा विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवला. वाढीव तिकीट दराचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
चक्का जाम करू- आडम मास्तर
भारतीय जनतेला ‘अच्छे दिन आने वाले है’ नारा देत सत्ता काबीज केली़ रेल्वेच्या दरात वाढ करुन जनतेचा विश्वासघात केला आहे़ ही दरवाढ मागे नाही घेतली तर सोलापूर शहरात चक्का जाम करु, असा इशारा माकपाचे नेते नरसय्या आडम यांनी दिला़ सोमवारी सकाळी विभागीय कार्यालयासमोर माकपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक थॉमस यांना निवेदन सादर केले़ मात्र व्यवस्थापकांनी या शिष्टमंडळासमवेत चर्चा करायला नकार दर्शविला़ कार्यकर्त्यांचा संताप पाहता ते चर्चेला तयार झाले़ या निदर्शनात एम़ एच़ शेख, नसीमा शेख, माशप्पा विटे, व्यंकटेश कोंगारी, शेवंताबाई देशमुख, युसूफ मेजर, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, सलीम मुल्ला, फातिमा बेग, महिबूब हिरापुरे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, सिद्धाराम उमराणी, बाबू कोकणे, दीपक निकंबे, दत्ता चव्हाण, अनिल वासम, प्रशांत म्याकल, सनी शेट्टी, रवी म्हेत्रे, नरसिंग म्हेत्रे, बाळकृष्ण म्याकल आदी सहभागी झाले होते़
-----------------------------------
रेल्वे प्रवासी संघटनेचा अनोखा निषेध
प्रवाशांना तिकिटाची वाढीव रक्कम देऊन सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे तिकीट दरवाढीचा रविवारी रेल्वे स्थानकावर जोरदार निषेध नोंदवत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या प्रवाशांना वाढीव रक्कम देऊन अनोखा निषेध नोंदवला. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव, अॅड. खतीब, नितीन नवगिरे, सतीश शिंदे, राजेंद्र कांबळे, अॅड. कुमार कापसे, मन्सूसिंग बाबावाले, दुबय्या इराबत्ती आदी सामील झाले होते.