गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:37 AM2019-11-12T10:37:28+5:302019-11-12T10:39:26+5:30

प्रकाशपर्व;  गुरुनानक दरबार, गुरुद्वारामध्ये कीर्तन, प्रवचन; सिंधी वसाहत उजळून निघाली

Recall and celebrate the thoughts of Gurunanak | गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

Next
ठळक मुद्देसिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघालागेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो

सोलापूर : शीख धर्मीयांचे पहिले धर्मगुरु गुरुनानक यांच्या विचारांचे स्मरण अन् त्यांच्या जयजयकाराने गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबार आणि अंत्रोळीकर नगरातील गुरुद्वारा लख-लख प्रकाशाने उजळून निघाला आहे. गुरुनानकांचा प्रकाशपर्व (जयंती) उद्या (मंगळवारी) साजरा होत असून, सिंधी समाज यानिमित्ताने एकवटला आहे. गुरुनानकांच्या प्रकाशपर्वानिमित्त दोन्ही ठिकाणी विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 

‘वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतिह’, हा संदेश घेऊन गुरुद्वारामध्ये ३० आॅक्टोबरपासून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९  पर्यंत सत्संग सुरु आहे. उद्या (मंगळवारी) जयंतीचे औचित्य साधून सकाळी ६ ते ८ या वेळेत रागी भाई प्रितपाल सिंघजी यांचे कीर्तन तर रात्री १० ते १२ पर्यंत वीर मनिंदरपाल सिंघजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत श्री गुरु ग्रंथ साहिब पाठची समाप्ती होणार असल्याचे गुरुद्वाराचे मुख्य सेवादार रमेशसिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
गुरुद्वारामध्ये येणाºया भाविकांना लंगरची (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुद्वारामधील धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली कपिल नानकानी, अमर सचदेव, मंगेश कटारिया, पवन लुल्ला, वासुदेव सचदेव, लवेज पहुजा, रोशन मुरजानी, रोहिन हेमनानी, विनोद नानकानी, प्रेम नानकानी, महेश भिकचंदानी, बलकारसिंग, बसंतसिंग बोमर आदी सिंधी बांधव परिश्रम घेत आहेत. 

गुरुनानक नगरातही गुरुनानकांचा प्रकाशपर्व
- सिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघाला आहे. गेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो. गुरुनानक दरबारातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश धनवानी, सुनील कुकरेजा, गिरीश कुकरेजा, हरीश नानकानी, इंद्रलाल होतवानी, किशोर होतवानी, लक्ष्मण होतवानी, शंकर होतवानी, पूनम गुदलानी, विशनदास माखिजा, मनोहरलाल तलरेजा आदी परिश्रम घेत आहेत.

एखादा माणूस कुठल्याही जाती-धर्मातील असो, त्याला कुठलेही संकट आले तर तो गुरुनानक दरबारात येऊन गुरुनानकांसमोर नतमस्तक झाला तर त्याचे सर्वच दु:ख, संकट दूर होतात. गुरुनानकांना विष्णू-राम-कृष्णाचे अवतार मानले जाते. सर्वच जाती-धर्मांमध्ये एकता नांदो, हीच गुरुनानकांकडे प्रार्थना.
-गागनदास कुकरेजा, सेवादारी- गुरुनानक दरबार.

Web Title: Recall and celebrate the thoughts of Gurunanak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.