या मार्गावरून जाताना वाहनधारकांना खड्ड्यातून वाहने चालवावे लागतात. हा रस्ता २५ पेक्षा जास्त गावांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या नादुरुस्त रस्त्यामुळे आत्तापर्यंत किरकोळ ६ अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा आशयाचे निवेदन युगंधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल गुंड यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह आमदार यशवंत माने, जिल्हाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. यावेळी सिद्राम वाघमोडे, शुभम खंदारे, ब्रह्मदेव वाकचौरे, साहेबराव वाकचौरे, गणेश पाटील, पांडुरंग माळी, धैर्यशील मेलगे, मयूर जावळे, बब्रुवान पाटील उपस्थित होते.
फोटो
०२नरखेड-रस्ता
ओळी
नरखेड ते डिकसळ मार्गावरील भोगावती नदीवरील डिकसळ बंधारऱ्याजवळील रस्ता वाहून गेला. खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे.