तालुक्यात ३ हजार वृक्षलागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:15 AM2021-06-29T04:15:58+5:302021-06-29T04:15:58+5:30
---------- असे आहे वृक्षलागवडीचे नियोजन पंचायत समिती आवार, ८३ ग्रामपंचायती, १८९ प्राथमिक शाळा, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १७ आरोग्य ...
----------
असे आहे वृक्षलागवडीचे नियोजन
पंचायत समिती आवार, ८३ ग्रामपंचायती, १८९ प्राथमिक शाळा, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १७ आरोग्य उपकेंद्रे, २९५ अंगणवाड्या, १५ पशुसंवर्धन केंद्रे या ठिकाणी पोषणयुक्त, आयुर्वेदिक, फळांची झाडे लावली जाणार आहेत. त्याचे संगोपन करण्याची सर्वस्वी जबाबदारी कर्मचाऱ्यांनी स्वीकारली आहे.
-------
आम्ही वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. ही सरकारी मोहीम नाही, तर आमची सामाजिक जबाबदारी आहे, याचे भान राखून त्याची अंमलबजावणी करण्याचा वसा माझ्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. संगोपन, संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी आहे.
- राहुल देसाई, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर
--------
फोटो : २६ दक्षिण सोलापूर
ओळी
तीन हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ करताना उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, धनेश आचलारे, शशिकांत दुपारगुडे, रंजना कांबळे, विवेक लिंगराज आदी.
---------