गोवे गल्लीत एका गृहस्थाने घराच्या पुढील बाजूचे बांधकाम चक्क रस्त्यावर केल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना याचा अडथळा होत आहे. येथील नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार लेखी तक्रारी देऊनही मुख्याधिकारी व नगर अभियंत्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत सोलापूर येथील नगरविकास जिल्हा प्रशासनाधिकारी डॉ. पंकज जावळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना अतिक्रमणाबाबत लेखी पत्र देऊनही याची दखल घेतली जात नाही. या ठिकाणी गटारीचे कामकाज करताना अतिक्रमण काढून गटार व रस्ता करण्याच्या सक्त सूचना दिल्या असतानाही अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवून गटारीचे व रस्त्याचे काम केले आहे. येत्या चार दिवसात सदरचे अतिक्रमण न काढल्यास २६ जानेवारी रोजी नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
ओळी :::::::::::::::::::::::::::::
मंगळवेढा शहरातील गोवे गल्लीत रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे छायाचित्रात दिसत आहे.