रस्त्याचे काम सुरू; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:16+5:302021-09-17T04:27:16+5:30

गुरुवारी ‘लोकमत’मध्ये लोकप्रतिनिधींनीच उपस्थित केला रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न हे वृत्त प्रसिद्ध झाले. आमदार सुभाष देशमुख व आमदार यशवंत माने ...

Road work underway; Notice the news of ‘Lokmat’ | रस्त्याचे काम सुरू; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

रस्त्याचे काम सुरू; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

Next

गुरुवारी ‘लोकमत’मध्ये लोकप्रतिनिधींनीच उपस्थित केला रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न हे वृत्त प्रसिद्ध झाले.

आमदार सुभाष देशमुख व आमदार यशवंत माने यांनी रस्त्याची कामे गुणवत्तेची करा, असे सांगितले होते. आमदार माने यांनी तर मी स्वतः रस्ते तपासणार असल्याचे म्हटले होते. बीबीदारफळ येथील बारसकर वस्ती ते गणेशवाडी या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधून २० लाख रुपये मंजूर झाले होते. त्यात दहा लाख रुपयांचे काम सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळाले होते. एका ठेकेदाराने केलेले काम आठवडाभरातच उखडले होते. मात्र दुसऱ्याने केलेल्या रस्त्यावरून ये-जा करता येते. अशातही लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एका ठेकेदाराने लागलीच कामाची दुरुस्ती सुरू केली. मात्र दुसऱ्याने अगोदरच काम खराब असताना दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले.

---१६बीबीदारफळ रोड

आठवड्यापूर्वीच केलेल्या कामानंतर उखडलेला रस्ता.

---

दोघांना बजावली नोटीस

रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार रयत क्रांती संघटनेच्या शशिकांत थोरात यांनी केली होती. जिल्हा परिषद उत्तर तालुका बांधकाम खात्याने दोन्ही ठेकेदारांना रस्ता दुरुस्तीसाठी दोन नोटीस बजावल्या होत्या. तरीही मुळे यांनी दखल घेतली नाही. त्या दोघांचीही १० टक्के रक्कम थांबवली असल्याचे अभियंता दत्तात्रय मंगरुळे यांनी सांगितले.

----

Web Title: Road work underway; Notice the news of ‘Lokmat’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.