कार्तिकी एकादशीविषयी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 02:58 PM2020-11-11T14:58:49+5:302020-11-11T15:05:26+5:30
सोलापूर जिल्ह्यातील विकासाबाबतही झाली चर्चा
सोलापूर : आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून, ती शासनापर्यंत पोचवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारकरी संप्रदाय कार्तिक यात्रा समन्वय समितीच्या शिष्टमंडळास आज दिले.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रयदायातील प्रमुख महाराज मंडळी, संतांचे वसंज यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे कृष्णकुंज निवासस्थानी प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या समवेत भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, देववृत वासकर महाराज, संजय महाराज चवरे, निवृत्ती महाराज नामदास, विष्णू महाराज कबीर, एकनाथ महाराज हांडे,रंगनाथ महाराज राशींकर, मोहन महाराज बेलापूरकर, जगन्नाथ महाराज देशमुख, रामकृष्ण हणमंत महाराज वीर इत्यादी उपस्थित होते.