बार्शी : गणेश वस्त्र दालनात कुटुंबासाठी वर्षभरापासून सुरू असलेल्या योजनेचा भव्य लकी ड्रॉ सोहळा परा पडला. या लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाच्या चारचाकी गाडीचे मानकरी बार्शी येथील सचिन लंकेश्वर ठरले आहेत. त्यांनी लग्नासाठीची खरेदी गणेश वस्त्र दालनातून केली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी नववधू सोबत घेऊन चारचाकी गाडी स्वीकारली.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हिरो होंडा मोटारसायकलचे बक्षीस शिवराज गटकळ (आंबी, ता. भूम) यांनी पटकावले. बालाजी पाटील यांनी (पाथरी, ता. बार्शी) यांनी तृतीय क्रमांकाचे पारिताेषिक स्कूटर जिंकली. यासोबतच सायकल, एलईडी टी. व्ही., होम थिएटर, फॅन, इस्त्री, कुकर, मिक्सर, मोबाईल, घड्याळ, हॉट पॉट, वॉटर प्युरिफायर, पर्स, लंच बॉक्स, कुलर, फ्रीज, मनगटी घड्याळ आदी एकशे एक बक्षिसे ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे देण्यात आली.
क्रांती नाना मळेगावकर यांचा महिला ग्राहकांसाठी खेळ रंगला पैठणीचा (होम मिनिस्टर) स्पर्धा घेण्यात आली. प्रियांका मराठे, शुभदा देवकते या पैठणी साडीच्या विजेत्या ठरल्या. कार्यक्रमासाठी माजी आमदार दिलीप सोपल, ह. भ. प. ॲड. जयवंत बोधले, अरुण कापसे, वाशीचे नगराध्यक्ष निश्चित चेडे, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती संजय लोखंडे, नगरसेवक विलास रेणके, नाना वाणी, जयंत राजे भोसले उपस्थित होते.
पुढील वर्षासाठीच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बक्षिसांची संख्या १०१वरून ३०१ केल्याची घोषणा उद्योजक महेश यादव, गणेश नान्नजकर, संतोष जाधवर, बाळासाहेब कामटे यांनी केली.
सूत्रसंचालन स्वेता हुल्ले यांनी केले. संतोष जाधवर यांनी आभार मानले. (वा. प्र.)
---
फोटो : ०५ बार्शी
गणेश वस्त्र दालनाच्या वतीने काढण्यात आलेल्या लकी ड्रॉचे विजेते सचिन लंकेश्वर यांना चारचाकी गाडीची चावी प्रदान करण्यात आली.