अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 04:19 AM2021-11-15T04:19:48+5:302021-11-15T04:20:30+5:30

आज कार्तिक एकादशी यात्रा

Saptnik passed away at the hands of Ajit Pawar on the occasion of Karthiki Ekadashi | अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा

अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा

Next

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा सोमवार १५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते.  यानंतर चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. 

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ औसेकर महाराज, नगराध्यक्षा साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मंदिर समितीचे अधिकारी गजानन गुरव आदी महसूल, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस दलातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यांना वारकऱ्यांनला महापूजेचा मान

यंदाच्या वर्षी हा मान कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

Web Title: Saptnik passed away at the hands of Ajit Pawar on the occasion of Karthiki Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.