सोलापुरातील ‘सारी’चे रुग्णही कोरोना पॉझिटिव्ह; २७ संशयित उपचारासाठी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:55 PM2020-04-21T12:55:57+5:302020-04-21T13:01:00+5:30
‘कोरोना’ पाठोपाठ ‘सारी’ चाही सोलापुरात शिरकाव; सोलापूर शहर हद्दवाढीत सर्वाधिक रुग्ण
सोलापूर : सोलापूर शहर हद्दवाढ परिसरात ‘सारी’ या आजाराचे काही संशयित १० एप्रिलपासून आढळले असून, सोमवारी पाँझीटिव्ह आढळलेल्या रुग्णात कोरोनाचे लक्षणे आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.
‘सारी’ हा आजार नवा आहे. पण याची लक्षणे सर्दी, ताप, खोकला अशीच आहेत. फक्त न्युमोनियासारखा ताप वाढला तर काळजी घ्यावी लागते. राज्यात काही ठिकाणी अशी लक्षणे असलेली रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्या धर्तीवर कोरोना साथीच्या उपाययोजना करताना सर्वेक्षणात अशी लक्षणे आढळलेल्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले जात आहे. अशी लक्षणे आढळलेले आत्तापर्यत २७ संशयित उपचारासाठी दाखल झाले. या सर्वांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. सोमवारी शहर हद्दवाढ भागातून दोन संशयित दाखल झाले आहेत. या रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आल्यावर पॉझिटिव्ह आले आहेत.
----------
काय आहेत लक्षणे...
‘सारी’ (सिव्हियर आॅक्युट रेस्पॉयरेटरी इन्फेक्शन) हा कोरोनासारखाच श्वसनासंबंधित आजार आहे. व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन हे सारीचं मूळ आहे. या आजाराची लक्षणे तीव्र झाल्यास रुग्णाला मृत्यू ओढवतो. यापूर्वी सारीने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यात श्वसनचा त्रास होणे, ताप, सर्दी, खोखला, फुफ्फुसांना सूज येणे, वयोवृद्ध, लहान मुलं व रोगप्रतिकार शक्ती कमी असणा?्यांना सारी आजार होण्याची शक्यता सर्वात जात आहे.