डॉक्टर तुमचा आरोग्य नीट आहे सांगतो म्हणून तुम्ही आरोग्यदायी राहता. (तो समाधान देतो म्हणून तुम्ही समाधानी आहात) बाबा कमावतो आणि तुम्हाला हव्या त्या तुमच्या गरजा पुरवतो आणि आई घरात जेवण बनवते तुम्हाला जपते तुमची सगळ्यांची काळजी घेते म्हणून तुम्ही आनंदी आहात. (ते समाधानात ठेवतात म्हणून तुम्ही समाधानी आहात) पण तुम्ही काहीच करत नाही तुमच्यात काही स्पूर्तीच नाही कशाची, तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही. अर्थात काय तूम्ही स्वतःला आनंदात ठेवणं फार गरजेचं तरच तुम्ही समाधानी राहू शकता.. आयुष्य आनंद हा फार कमी उरलाय लोकांच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो असमाधानी आहे.. लोक दुसऱ्याकडून आनंद शोधून समाधानी होण्याच्या प्रयत्नात असतात मी म्हणेल तुम्ही दुसऱ्याला आनंदी ठेऊन अधिक समाधानी होऊ शकता... सुख हे पाहण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे ते अनुभवायला जमलं की तुम्ही समाधानी आहात... आणि तुमच सुख हे कशात आहे हे तुम्हाला ठाऊक असायलाच हवा... मुलांचे सुख जर त्याच्या आईवडिलांचा आनंदात असेल तर त्या मुलांनी त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच ते समाधानी आहेत.. नवरा बायकोचे सुख जर एकमेकांच्या स्वप्न पूर्तीत असेल तर त्यांनी एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यानेच ते आनंदी सुखी समाधानी होऊ शकतात.. भुकेल्या अन्न तहानलेल्या पाणी अज्ञानाला ज्ञान आणि आपल्या माणसाला साथ ह्या गोष्टी जरा अचूक झाल्या तर समजा समाधान आले.
- हरिदास सुतार महाराज,