‘त्या’ पोलीस गाडीतील व्हीआयपी भाविकांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:14 AM2021-07-23T04:14:56+5:302021-07-23T04:14:56+5:30
पंढरपूर : ऐन आषाढी एकादशी दिवशी संचारबंदी असतानादेखील पोलीस गाडीमध्ये श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीच्या दर्शनासाठी आलेल्या व्हीआयपी भाविकांचा ...
पंढरपूर : ऐन आषाढी एकादशी दिवशी संचारबंदी असतानादेखील पोलीस गाडीमध्ये श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीच्या दर्शनासाठी आलेल्या व्हीआयपी भाविकांचा शोध उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम घेत आहेत.
सध्या कोरोनाची दुसरी लाट संपली असली तरी अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी होईल आणि पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल या भीतीपोटी शासनाने पंढरपूर शहर व तालुक्यातील काही गावांमध्ये १८ ते २५ जुलै या कालावधीत संचारबंदी केली.
परंतु पोलीस अधिका-यांनीच संचारबंदीचा कायदा धाब्यावर बसवत स्वतःच्या नातेवाइकांना पोलीस गाडीमध्ये श्री विठ्ठल मंदिर परिसरात नामदेव पायरीच्या दर्शनासाठी आणून सोडले.
ही बातमी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस गाडीमध्ये व्हीआयपी भाविकांना दर्शनासाठी आणणा-या पोलीस चालकाचा व व्हीआयपी भाविकांचा शोध घेण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना दिले आहेत. त्यानुसार कदम यांनी चौकशी सुरू केली असून, दोन दिवसांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठवणार आहेत.
-----
फोटो
संचारबंदीच्या कालावधीत पोलीस गाडीमधून नामदेव पायरीच्या दर्शनासाठी आलेले नागरिक.