सोलापूर : पूर्व भागातील बहुतांश भक्तगण हे शैव पंथीय आहेत़ अशा या शैव पंथीय बांधवांच्या परिसरात वैष्णव पंथाचे श्री व्यंकटेश्वर स्वामींचे मंदिर उठून दिसते़ स्वामी व्यंकटेश्वर हे विष्णूचे अवतार आहेत़ त्यांची आराधना सोलापुरातील भक्तांकडून इतक्या भक्तिभावाने होत आहे की त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे़ झेंडूच्या पुष्पमालेत जसा गुलाब देखना...तशी बालाजीची भक्ती अन् आसक्ती येथील भक्तांच्या मनात आहे.
तिरुपती येथील ब्रह्मवृंदात यज्ञाचार्य चिलकापाटी तिरुमलाचार्य यांना विशेष स्थान आहे़ ते गेले सहा दिवस सोलापुरात होते़ दाजी पेठेतील बालाजी मंदिरात त्यांच्या मार्गदर्शनानुसार ४७ वा ब्रह्मोत्सव पार पडला़ रविवारी सायंकाळी ब्रह्मोत्सवाचा समारोप झाला़ त्यानंतर ते लगेच तिरुपतीला रवाना झाले़ गेल्या पंधरा वर्षांपासून तिरुमलाचार्यलू ब्रह्मोत्सवाकरिता सोलापुरात येतात़ त्यांना यंदा पंचवीस हजारांचे मानधन देण्यात आले़ तिरुपतीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी बालाजी मंदिराच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला़ पदाधिकाºयांना काही सूचनादेखील त्यांनी दिल्या़ पुढील ब्रह्मोत्सवपूर्वी त्या सूचनांचे पालन करण्याची ग्वाही येथील पदाधिकाºयांनी दिली.
अधिक माहिती देताना मंदिराचे आर्चक स्वामी किरणकुमारचार्यलू यांनी सांगितले, येथील भक्तीचे वातावरण पाहून यज्ञाचार्य खूप प्रभावित झाले़ येथील भक्तांमध्ये भक्तीची आसक्ती प्रचंड आहे़ ही आसक्ती निर्मळ आहे़ आपल्या हातून स्वामींची सेवा व्हावी, असे प्रत्येकाला वाटते़ आणि प्रत्येकजण त्याकरिता प्रयत्नशील असतो़ मंदिरात नि:स्वार्थ सेवा करायला येणाºयांची संख्या मोठी आहे़ काही महिला रोज नित्यनियमाने मंदिरात स्वच्छता आणि झाडलोट करताना दिसल्या़ त्यांनी कोणी सांगत नव्हते़ ठराविक वेळेला त्या येत होत्या आणि त्यांची सेवा त्या नि:स्वार्थपणे करत होत्या़ त्यांची सेवा मनाला स्पर्शून गेली़ मी खूप प्रभावित झालो, असे यज्ञाचार्य चिलकापाटी यांनी मला सांगितले.
तिरुमलाचार्यलू यांच्यासोबत तिरुपती येथील पुरोहित गोकुळ स्वामी, अविनाश स्वामी, श्रीनिवास स्वामी, भार्गव स्वामी आदी आर्चक स्वामींनी ब्रह्मोत्सव पार पाडला़ या सर्व ब्रह्मवृंदांना प्रत्येकी १५ हजारांचे मानधन देण्यात आले.
पुष्करणीचे निर्माण व्हावे- ब्रह्मोत्सव काळात उत्सवमूर्तीवर स्रानविधी करावा लागतो़ यास महत्त्व आहे़ येथील बालाजी मंदिर खूप आकर्षक आहे़ पण येथे पुष्करणी अर्थात जलसाठा नाही़ पुढील वर्षापर्यंत छोटेखानी तलाव तयार करावा, अशी सूचना तिरुमलाचार्यलू यांनी येथील पदाधिकाºयांना केली़ या सूचनेचे पालन करण्याची ग्वाही पदाधिकाºयांनी दिली.- ज्येष्ठ पुजारी यज्ञाचार्य चिलकापाटी तिरुमलाचार्यलू