आझादी के सत्तर साल बाद अब हम आझाद हुए !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 03:40 PM2019-08-06T15:40:41+5:302019-08-06T15:40:47+5:30
सोलापूर शहरातील काश्मिरी माथाडींच्या भावना
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : ‘पाजी, अपने देश को आझादी मिल के ७० साल हुए. लेकीन जम्मू-काश्मीर मे लोग आझादीसे जी नही पाते थे. आज वहाँसे कलम ३७० हटाया गया, ये हमारे लिए खुशी की बात तो है.़ लेकीन सबसे खुशी की बात तो ये है की, हम अब आझाद हुए’, या शब्दात गेल्या अनेक वर्षांपासून एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करणाºया काश्मीरमधील माथाडी कामगारांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
सोमवारी राज्यसभेत झालेल्या मतदानानंतर जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करताना शहर आणि ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत झाले. एकीकडे या निर्णयाबद्दल आनंदोत्सव होत असताना दुसरीकडे काश्मीरमधून सोलापुरात आलेल्या माथाडी कामगारांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करीत आनंदोत्सव साजरा केला.
केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आता तेथील लोक यापुढील आयुष्य गुण्यागोविंदाने घालवतील.
-ककूराम, बडूर,
ता. रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.
कलम ३७० हटवण्यात आले. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सूर्य उगवणार आहे. या सूर्याला साक्षी मानून तेथील जनता भयमुक्त वातावरणात राहतील, याचा अधिक आनंद आहे.
-पुशबकुमार, ब्राह्मणी, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.
गेली ७० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये होणाºया दहशतवादी हल्ल्यास लोक कंटाळले होते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. आता ही मुले चांगले शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास वाटतो.
- रविकुमार, पंज गारियन,
रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.
दहशतीच्या भीतीपोटी जम्मू-काश्मीरमधील अनेक जण पोटापाण्यासाठी इतरत्र गेलेले आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यावर आता तेथे रोजगार उपलब्ध होईल. बाहेर गेलेले पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये परततील.
-हर्षराज, पंज गारियन, रामनगर,
जि. उदमपूर, जम्मू.