मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौºयामुळे शरद पवारांचा कार्यक्रम लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 02:26 PM2020-10-09T14:26:54+5:302020-10-09T14:29:27+5:30
कार्यकर्त्यांचा सोलापुरात होणार मेळावा; राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा
सोलापूर : जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य दौºयाचा कार्यक्रम आल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचा १० आॅक्टोबरचा दौरा लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी जाहीर केलेला नियोजित दौराही अचानक रद्द केल्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे महामारीच्या उपाययोजनेत प्रशासकीय यंत्रणा गुंतली व राजकीय हालचाली मंदावल्या होत्या. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यावर कोरोना साथीचा उद्रेक मंदावल्याचे दिसून आल्यावर राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
कोरोना साथीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी सोलापूर दौरा केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात ते पंढरपूर दौºयावर आले होते. या दौºयातच त्यांनी १० आॅक्टोबर रोजी सोलापूर दौºयाचे सूतोवाच केले होते. त्यामुळे पवार यांच्या दौºयाबद्दल कुतूहल वाढले आहे.
एमआयएमच्या नगरसेवकांनी मुंबईत त्यांची घेतलेली भेट व शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमाला हजेरी हे विषय चर्चेचे झाले आहेत.
नियोजित तारीख जवळ आली तरी खासदार पवार यांच्या दौºयाबाबत अधिकृत कार्यक्रम न आल्याने संबंधित कार्यक्रम संयोजकांकडे विचारणा केली असता मुख्यमंत्री ठाकरे यांचाही २४ आॅक्टोबर रोजी दौरा ठरत असल्याने नियोजित कार्यक्रम पुढे गेल्याचे सांगितले.
या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकाचवेळी सोलापुरात येतील, असे आता सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी खासदार पवार यांचा अधिकृत दौरा अद्याप आला नसल्याचे स्पष्ट केले असले तरी या दौºयाकडे अनेक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे़ अनेकांनी निवेदनांची तयारी चालवली आहे़
सोलापुरात होणार मेळावे
मुख्यमंत्री ठाकरे कोरोना साथीच्या संकटानंतर प्रथमच सोलापूर दौºयावर येत आहेत. साथीचा आढावा व खासगी कार्यक्रमास उपस्थिती असा त्यांचा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार पवार हेही खासगी कार्यक्रमाबरोबरच शहरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही हजर राहणार आहेत. या मेळाव्यात बरीच राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे.