बार्शी : बार्शी शहरात सायंकाळपर्यंत बार्शी वैराग येथील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले आले. एवढ्यावरच न थांबता रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल ३१ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. यामध्ये वैराग येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सकाळी १ आणि रात्री उशिराचा अहवालात १० अशा ११ कैद्यांचा समावेश आहे. दिवसभरात ३६ रुग्ण नव्याने वाढले आहेत. आता बाधितांची आजपर्यंतची संख्या ९४ झाली आहे.
रात्री उशिरा आलेल्या अहवालात बार्शी सब जेल मधील १० कैदी, माढा तालुक्यातील रिधोरे व भोसरे येथील प्रत्येकी एक, बार्शी शहर १० , वैराग ११, साकत पिंपरी २ असे एकूण ३६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दु:खद बातमी म्हणजे वैराग येतील दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहर व तालुक्यातील एकूण बधितांचा आकडा हा ९४ झाला आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केलेल्या अहवालामध्ये बार्शी तालुक्यात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. बार्शीमध्ये आढळून आलेल्या बाधितांमध्ये बार्र्शी सबजेलमधील ११ कैद्याचा समावेश आहे़ आजवर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४ झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
बार्शीच्या सबजेलमधील कैद्याला जेलमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या गार्डच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे़ या कैद्याला कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
२८ उपचारानंतर बरेतालुक्यात आजवर ९४ जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ तर २८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत़ अद्याप २६ जणांवर कोविड केअर सेंटर व जगदाळेमामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़