सोालपूर : गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात वारंवार अतिवृष्टी झाली. सर्वाधिक अतिवृष्टी ऑक्टोबरमध्ये झाली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी यातून बाधित झाले. पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा, माढा तसेच बार्शी तालुक्यांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला. जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला.
शासनाने पहिल्या टप्प्यात २९४ कोटी मदत निधी सोलापूर जिल्ह्याला दिली. २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत मिळाली. उर्वरित दोन लाख ४० हजार शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राज्य शासनाकडे दुसऱ्या टप्प्यातील मदत निधीची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी डिसेंबर-२०२० अखेर किंवा जानेवारी-२०२१च्या पहिल्या आठवड्यात वाटप करू, असे सांगितले. त्यामुळे २ लाख ४० हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यांतील मदत निधीची अपेक्षा लागून राहिली आहे.
फळबागांसोबत जिल्ह्यातील पशुधनाचेही मोठे नुकसान मागील व आम्हाला मदत कधीपर्यंत मिळणार मिळणार अतिवृष्टीत आमचे सर्वकाही नुकसान झाले. आम्ही फार उद्ध्वस्त झालो. तत्काळ मदत निधी मिळणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात आम्हाला मदत मिळाला नाही. त्यामुळे आमच्या अडचणीत वाढ झाली आहे.
- रामदास चौगुले
पंढरपूर, शेतकरी
शासनाकडे निधीची मागणी
दव्ऱ्या-या टप्प्यातील मदत निधी संदर्भात राज्य शासनाकडे मागणी केली आहे. शासनाकडून अद्याप काही माहिती आलेली नाही. शासनाकडून निधी आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वाटप करू.
^ मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी, सोलापूर