धक्कादायक; रस्त्यासाठी शेकडो पक्ष्यांची शेकडो घरटी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:39 PM2020-08-26T12:39:07+5:302020-08-26T12:41:22+5:30
अंडी गेली अन् पिल्लंही नसल्याने पक्ष्यांची सैरभैर सुरू
सोलापूर : हायवेसाठी अक्कलकोट रोडवरील शेकडो झाडांची कत्तल होत असताना पक्ष्यांची शेकडो घरटी उद्ध्वस्त झाली. पक्ष्यांचा प्रजनन काळ सुरु असताना माणूसरूपी काळाने त्यांच्यावर घाला घातला. घरटीच नाहीत अन् त्यातील पिल्लंच नसल्याने पक्षी मात्र सैरभैर दिसत होती. प्रसंग होता कुंभारी रोडवरील आसारामबापू आश्रमासमोरील.
या झाडांवर सुगरण, कंठी होल, तांबडा होला, गांधारी खाटीक, रान खाटीक, बुलबुल, टिपक्याची मुनिया, सिल्वर मुनिया, काळ्या डोक्याची मुनिया या पक्ष्यांची घरटी विविध झाडांवर होती.
अमेरिकेत काही पक्ष्यांच्या घरटी होत्या. त्यामुळे तेथील काम थांबविण्यात आले. आज विविध पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पक्ष्यांचे जतन करणे ही पक्षीप्रेमींची भावना आहे. वनविभागाने याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे पक्षीप्रेमी बोलत आहेत.