अक्कलकोटमध्ये आदेश ठोकरुन दुकाने उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:16 AM2021-04-29T04:16:59+5:302021-04-29T04:16:59+5:30
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवावीत, अशा ...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवावीत, अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्याची अंमलबजावणी करणे सर्वांवर बंधनकारक आहे, तरीही अक्कलकोट येथे काहीजण अत्यावश्यक सेवेत नसतानाही दुकाने कधी चोरून तर कधी राजरोसपणे सुरू ठेवत होते. नगरपालिका व पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. यावेळी दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे त्या सर्व दुकानांना सील ठोकण्यात आले.
ही कारवाई अक्कलकोट नगरपालिकेचे अधिकारी विठ्ठल तेली, मल्लीनाथ स्वामी, मालिका बागवान, भागवत सांगोलकर, नवनाथ शिंदे, विनायक येवले, सुरज राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली आहे.
या दुकानांवर झाली कारवाई
महिंद्रकर कापड दुकान, मेन रोड, तिरुपती स्टेशनरी, समर्थ चौक (गुमटे), विश्राम जीवराज पटेल (तुळजाभवानी ट्रेडर्स), नीलेश शंकर माशाळे, विजय कामगार चौक (सावित्री फूट वेअर), संजय गणात हरवाळकर (बालाजी फूट वेअर), स्वामीनाथ आनंद हेगडे (शुभम मोबाइल दुकान), अनिल स्टील, पंचायत समितीसमोरील झेरॉक्स दुकान, मसुती ए-वन चौक, अक्कलकोट अशा तब्बल आठ दुकानांना आतापर्यंत सील ठोकले आहे.
कोट ::::::::::::
सील ठोकलेल्या सर्व दुकानदारांना अनेकवेळा तोंडी सांगूनही त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे अखेर दुकानांवर कारवाई करुन सील ठोकले आहे. या दुकानांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
- मलिक बागवान, कार्यालयीन प्रमुख, नगरपालिका
फोटो
२८ अक्कलकोट कारवाई
-----
अक्कलकोट येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असताना सुरू ठेवल्याने दुकानाला सील ठोकताना विठ्ठल तेली, मल्लीनाथ स्वामी, मलिक बागवान.