सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेची जय्यत तयारी चालू आहे़ यंदा प्रथमच योग समाधीवर खास मेरठ येथून आणलेल्या झुंबरांतून पडणाºया प्रकाशात योगसमाधी परिसर उजळून निघणार आहे़ यात्रा कालावधीत पंधरा ते वीस दिवस हे झुंबर प्रकाशमान राहणार आहेत.
दरवर्षी यात्रेत योगसमाधी परिसरात मंडप व्यवस्था पाहणारे दत्ता जुकदार यांनी ‘लोकमत’च्या प्रकाशमय यात्रेस प्रतिसाद देत यंदा खास मेरठ येथून झुंबर मागविले आहेत.
जुकदार यांच्याकडे यात्रेच्या मिरवणुकीतील पंचरंगी ध्वजानंतर असणारा भगव्या ध्वज धरण्याचा मान आहे़ सिद्धरामेश्वर यात्रा काळात योग समाधीस आकर्षक मंडप सजविण्याचा त्यांचा मानस असतो. त्याच वेगळेपणातून यंदा झुंबर बसविण्याचा मनोदय मंदिर समितीकडे व्यक्त केला अन् त्यांना मंदिर समितीकडून परवानगी मिळाली़ वर्तुळाकार साडेतीन फूट बाय चार फूट उंचीचे बारा झुंबर असणार आहेत़ सहा फूट वर्तुळाकार बाय साडेसात फूट उंचीचा एक भव्य झुंबर असणार आहे. मेरठ येथून २४ डिसेंबरला खास पॅकिंग करून ट्रकने सोलापूरला येण्यास सहा दिवस लागले़ सोमवारपासून त्यांची बांधणी करून सजविण्यास सुरुवात झाली असून येत्या दोन दिवसात ते प्रज्वलित होणार आहेत़
दत्ता जुकदार हे एस. व्ही. मंडपच्या माध्यमातून व्यवसाय करतात. मागील वर्षापासून ‘लोकमत’ ने सुरू केलेल्या प्रकाशमय यात्रेची प्रेरणा घेऊन यंदा सिद्धरामेश्वर योगसमाधी परिसर झुंबरच्या प्रकाशाने उजळवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यास देवस्थान पंचकमिटीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. या माध्यमातून सिद्धरामेश्वरांची सेवा घडते याचे समाधान वाटते़- दत्ता जुकदार, संचालक-एस़ व्ही़ मंडप, सोलापूर