सोलापुरात एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू; 'कोरोना' बाधितांची संख्या पोहचली ५१६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:28 PM2020-05-22T21:28:14+5:302020-05-22T21:29:01+5:30

आज दिवसभरात आढळले २८ रुग्ण; २५२ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

Six killed in a single day in Solapur; The number of 'Corona' victims reached 516 | सोलापुरात एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू; 'कोरोना' बाधितांची संख्या पोहचली ५१६ वर

सोलापुरात एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू; 'कोरोना' बाधितांची संख्या पोहचली ५१६ वर

Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : सोलापूरात गेल्या २४ तासात कोरोना बाधितांची संख्या वाढून ती ५१६ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ५३५३ रूग्णांची कोरोना चाचणी झाली यात
५१९४ अहवाल प्राप्त झाले. यात ४६७८ निगेटिव्ह तर ५१६ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. अजून १५९ अहवाल प्रतिक्षेत आहेत.

आज एका दिवसात १८० अहवाल प्राप्त झाले यापैकी १५२ निगेटिव्ह तर २८ पॉझिटिव्ह अहवाल आहेत यात १४ पुरूष आणि १४ महिलांचा समावेश आहे. रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या २२४ तर २५२ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या ४० वर पोहोचली असून यात २६ पुरूष आणि १४ महिलांचा समावेश आहे.


आज ६ जण मृत आसल्याचे जाहिर करण्यात आले. यात ६४ वर्षीय पुरूष पाचेगांव सांगोला येथील आहेत. तर दुसरी व्यक्ती कुर्बान हुसेन नगर येथील ५८ वर्षीय पुरूष आहे. तिसरी व्यक्ती तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील ७२ वर्षीय पुरूष आहे. तर चौथी व्यक्ती देगांव रोड परिसर सलगरवस्ती येथील ५५ वर्षीय पुरूष आहे. पाचवी व्यक्ती मराठा वस्ती भवानी पेठ येथील ५८ वर्षीय महिला आहे. आणि सहावी व्यक्ती जुळे सोलापूर सिध्देश्वर नगर येथील ४६ वर्षीय पुरूष आहे.

आज मिळालेले रुग्ण आहेत या भागातील

  • नई जिंदगी १ महिला,
  • कुमठा नाका १ पुरूष, १ महिला.
  • नीलम नगर ३ पुरूष, ६ महिला.
  • नई जिंदगी शोभा देवी नगर १ पुरूष.
  • मिलिंद नगर बुधवार पेठ १ पुरूष.
  • शिवशरण नगर एमआयडीसी १ महिला.
  • सातरस्ता १ पुरूष.
  • लोकमान्य नगर ३ महिला.
  • पुणे नाका १ पुरूष.
  • मुरारजी पेठ २ पुरूष, १ महिला.
  • जगदंबा नगर १ पुरूष.
  • हैदराबाद रोड सोलापूर १ पुरूष.
  • उपरी ता. पंढरपूर १ पुरूष.
  • मराठा वस्ती भवानी पेठ २ महिला.
  • कर्णिकनगर १ पुरूष.

Web Title: Six killed in a single day in Solapur; The number of 'Corona' victims reached 516

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.