मांडूळ विक्रीप्रकरणी मंगळवेढ्यातील तिघांसह सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:45+5:302021-02-05T06:48:45+5:30

कवठे महांकाळजवळील मेघराज मंदिराजवळ दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी टोळी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याआधारे उपविभागीय पोलीस ...

Six people, including three from Mars, have been booked in connection with the sale of a forehead | मांडूळ विक्रीप्रकरणी मंगळवेढ्यातील तिघांसह सहा जणांवर गुन्हा

मांडूळ विक्रीप्रकरणी मंगळवेढ्यातील तिघांसह सहा जणांवर गुन्हा

Next

कवठे महांकाळजवळील मेघराज मंदिराजवळ दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी टोळी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याआधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, शिवाजी करे, दीपक गायकवाड, संजय चव्हाण, अण्णासाहेब भोसले, प्रशांत मोहिते, चंद्रसिंग साबळे, वनपाल आर. आर. चौगुले, वनरक्षक डी. एस. बजबळकर यांनी सापळा लावला. त्यात मंगळवेढा तालुक्यातील तिघे, कोल्हापूरचे दोघे, बेळगावमधील एक अशा सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील वायरच्या पिशवीत तीन मांडूळ जातीचे साप आढळून आले.

पोलिसांनी गजानन वसंत सरगर, संजय अशोक ओलेकर, तिपण्णा म्हाळाप्पा तडकळे (रा. सलगर खु., ता. मंगळवेढा), महादेव मनोहर बेनाडे, युवराज दत्तात्रय मकदूम (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर), वाहनचालक विवेक राजेंद्र बेनाडे (रा. डोणेवाडी, जि. बेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फोटो लाईन

०२पंड०६

मांडूळ जातीच्या सापासह ताब्यात घेतलेल्या इसमांसमवेत पोलीस अधिकारी, कर्मचारी.

Web Title: Six people, including three from Mars, have been booked in connection with the sale of a forehead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.